व्यसन सोडल्यामुळे झाला करोडपती


नवी दिल्ली – कोशिश करनेवालों कभी हार नहीं अशा प्रकारची एक म्हण खुपच प्रचलित आहे. पण ही म्हण ‘या’ व्यक्तीवर अगदी तंतोतंत फिट बसते. आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याचे जीवन तीन वर्षात व्यसनामुळे होत्याचे नव्हते झाले होते. लॉस एंजिल्समध्ये रहणारे खलील राफती यांनी व्यसनापायी आपले घर आणि सर्व संपत्ती गमावली. त्यामुळे त्याला अक्षरशः रस्त्यावरच जीवन जगावे लागले होते.

१९९०मध्ये खलील लॉस एंजिल्समध्ये आले होते. त्यांनी सुरवातीला तिथे कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला. पण याचदरम्यान त्यांना ड्रग्सचे व्यसन लागले. त्यानंतर त्यांना हेरॉईन घेण्याची सवयच लागली आणि त्यांचे व्यवसायात फार मोठे नुकसान झाले.

२००१साली आपल्या खलील यांनी एक पार्टी ठेवली होती आणि याचदरम्यान अतिप्रमाणात ड्रग्सचे सेवन केले. ज्याच्यामुळे खलील यांना दोन वर्षासाठी जेलची हवा खावी लागली होती. खलील जेव्हा जेलमधून सुटले तेव्हा त्यांना माहीत पडले की त्यांची संपत्ती कर्जदारांनी जप्त केली होती. त्यामुळे खलील रस्त्यावर आले.

ड्रग्सपासून मुक्तीसाठी खलील यांनी व्यसनमुक्ती केंद्र गाठले. त्याचदरम्यान त्यांच्या एक मित्राने त्यांना ज्यूस आणि सुपरफूडमध्ये काम मिळवून दिले. जिथे त्यांनी स्मूदी बनवायला शिकले. शेजारीच असलेल्या हॉस्पिटलमध्ये या स्मूदीची जास्त प्रमाणात मागणी असायची. त्यांनी बनवलेले स्मूदी लोकांच्या पसंतीस उतरू लागले. त्यानंतर जुगारात जिंकलेले ३२ लाख रुपयात आपल्या प्रियेसी सोबत मिळून एक ज्यूसबार सुरु केला. या ज्यूसबारचे नाव त्यांनी सनलाईफ ओर्गेनिक्स ठेवले. आजच्या घडीला लॉस एंजिल्समध्ये त्यांच्या ६ शाखा आहे. त्यांनी याबाबतचा उल्लेख आपल्या संघर्षमय जीवनावरील पुस्तक ‘आय फरगॉट टू डाय’मध्ये केला आहे.

Leave a Comment