जेपी नड्डा होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष


नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कार्यकाळ या महिन्यात संपणार असून शहा यांचा कार्यकाळ लोकसभा निवडणूकीमुळे वाढवण्यात आला होता. सार्वत्रिक निवडणुकानंतर आणि शहा यांनी गृहमंत्री म्हणून मंत्रिमंडळात प्रवेश केल्यानंतर, भाजपचे कार्यवाहू अध्यक्ष जेपी नड्डा यांना बनविण्यात आले. आता जेपी नड्डा हे अमित शहा यांच्यानंतर पक्षाचे पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील अशी चर्चा आहे. फेब्रुवारी महिन्यात ते पक्षाची सत्ता हाती घेऊ शकतात. 19 किंवा 20 फेब्रुवारी रोजी जेपी नड्डा यांना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात येईल.

भाजपच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त प्रदेशांच्या निवडणुका 19 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होतील आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक त्यानंतरच होईल. सूत्रांच्या माहितीनुसार जेपी नड्डा हे पक्षाचे अकरावे अध्यक्ष होणार आहेत. भाजपमध्ये सध्या संघटना निवडणुका सुरू आहेत. यानंतर, नड्डा पुढील तीन वर्षे जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतील. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी लागणार्‍या अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया 18 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल.

Leave a Comment