टी-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा


मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषकासाठी निवड झाली आहे. महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेला पुढच्या महिन्यात सुरुवात होणार आहे, आज त्यासाठी संघाची घोषणा झाली आहे. हरमनप्रीत कौरच्या हाती टीम इंडियाच्या महिला संघाची धुरा असणार आहे. तर उपकर्णधार मराठमोळी स्मृती मनधाना असणार आहे.

निवड समितीने विश्वचषकाच्या संघात युवा फलंदाज शेफाली वर्मावरही विश्वास दाखवला आहे. शेफालीला अवघ्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. शेफालीच्या टी-20 कारकिर्दिवर नजर टाकल्यास तिने 9 सामने खेळले आहेत. या 9 सामन्यामध्ये शेफालीने 142.30 च्या सरासरीने 222 धावा केल्या आहेत. तर 73 ही तिची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकाचे आयोजन होत आहे. विश्वचषक स्पर्धा पुढच्या महिन्यात 21 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचा पहिलाच सामना तगड्या ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.

भारतीय संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मनधाना (उप कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रिचा घोष, तान्या भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर आणि अरुंधती रॉय

Leave a Comment