घरामध्ये काकड्या लावायच्या असल्यास


काकड्यांच्या वेली खरे तर घराबाहेरच्या आवारात चांगल्या येत असल्या तरी या वेली घराच्या आतमध्ये लावल्याने काकड्यांचे मुबलक उत्पन्न संपूर्ण वर्षभर मिळू शकते. घराच्या आतमध्ये काकडीचे वेल लावायचे असल्यास, त्या दृष्टीने खास तयार केल्या गेलेल्या काकडीच्या जाती विचारात घ्याव्यात. ‘ बुश ‘ या प्रकारात मोडणाऱ्या काकडीचा वेल घरामध्ये मोठ्या कुंड्यांमध्ये लावता येतो, किंवा बाहेरही लावता येतो. कारण इतर काकड्यांच्या वेली जितक्या पसरतात, तितक्या ‘ बुश ‘ काकड्यांच्या वेळी पसरत नाहीत. त्यामुळे त्यांना वाढण्यासाठी माफक जागा ही पुरेशी असते. या प्रकारच्या काकड्यांचा वापर चायनीज प्रकारची, व्हिनेगर वापरून बनविलेली लोणची आणि सॅलड्समध्ये प्रामुख्याने केला जातो.

काकडी ही वेलींवर होणारी फळभाजी आहे, त्यामुळे या वेलींना फैलाविण्यासाठी मुबलक जागेची आवश्यकता असते. या वेलींची पानेही मोठाली असतात. त्यामुळे या वेलींचा विस्तार लक्षात घेऊन, आपल्या घरामध्ये मुबलक जागा असेल, तर ह्या वेली घराच्या आतमध्ये लावण्यास हरकत नाही. त्याचबरोबर एकदा या वेलींवर काकड्या यायला सुरुवात झाली की ह्या वेळी पुष्कळ वजनदार होतात. त्यामुळे या वेली वर चढविण्यासाठी भक्कम आधार असेल हे पाहावे. काकडीचा वेल फार वेगाने फोफावतो त्यामुळे त्याला चढविण्यासाठी आधार आधीच तयार असावा.

जर आपण घराच्या आतमध्ये काकडीचा वेल लावणार असू, तर त्या वेलीला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल याची खबरदारी घ्यावी. जर एखाद्या खोलीवजा जागेमध्ये काकडीचा वेल चढविण्याचे ठरविले असेल, तर या खोलीला एखादी मोठी खिडकी असेल असे पाहावे, जेणेकरून भरपूर उजेड त्या खोलीमध्ये येईल. या वेलीच्या व्यवस्थित वाढीकरिता त्यांना दिवसातून किमान सहा ते सात तास सूर्यप्रकाश मिळेल ह्याची काळजी घ्यावी.

काकड्यांच्या वेलींना पाणी भरपूर लागते. साधारणपणे जी झाडे आपण घराच्या आतमध्ये लावतो, त्यांच्या मानाने काकड्यांच्या वेलींना पाणी खूपच जास्त लागते. विशेषतः काकडीच्या वेलीवर काकड्या येण्याच्या वेळी सतत पाणी द्यावयास हवे. काकडीच्या वेलींना काकड्या येत असताना प्रत्येकी दोन ते तीन लिटर पाणी दररोज देणे आवश्यक आहे. काकड्या लावताना आपण राहतो त्या परिसराचे हवामानही विचारात घ्यावयास हवे. काकड्यांसाठी दिवसा तेवीस ते पंचवीस डिग्री तापमान आणि रात्रीच्या वेळी पंधरा ते एकवीस डिग्री तापमान योग्य समजले जाते.

घरामध्ये काकड्या लावण्याआधी आपल्या घराच्या परिसरासाठी कोणत्या प्रकारच्या काकड्यांच्या वेली लावणे योग्य ठरेल या विषयी अभ्यास करावा. योग्य जागा निवडून, भरपूर सूर्यप्रकाश मिळेल याची खबरदारी घेऊन, तसेच योग्य वेळी पाणी आणि योग्य हवामान ही सर्व काळजी घेतल्यास काकड्यांचे उत्पन्न घरामध्ये लावलेल्या वेलींपासूनही मिळविता येऊ शकेल.

Leave a Comment