अखेर शिबानीशी विवाहबद्ध होणार फरहान अख्तर


सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत असून हिंदी सिनेसृष्टीत कधी कोणाचे नाव कोणासोबत जोडले जाईल याचा काही नेम नाही. त्याचप्रमाणे बॉलीवूडमध्ये ब्रेकअप आणि घटस्फोट अशा अनेक चर्चा कायम रंगत असतात. त्यातच दोन वर्षांपूर्वी पत्नी अधुनापासून अभिनेता फरहान अख्तर विभक्त झाला होता. पण त्याने या मुद्दयावर कधीही भाष्य केले नाही.

View this post on Instagram

Happy birthday my better half .. thank you for all the magic, laughter and love you have brought to my life .. you are one of the most beautiful souls I have ever met and the world really needs more like you! I’ve never met anyone as kind, as attentive, as selfless, as brave and as focused as you.. Just being around you has taught me so much ( mainly patience!!) You inspire me! thank you for including me in every part of your life, for making me feel so special and for always making time for ‘us’ !! Having said that you do need to ‘unclench’ a little.. be more ‘free flowing’ 🙄😂 To many more sessions in the ring, savouring protein bars together,late night walks with Jim Jam, Jlo movies, finishing my word crossy and foot rubs!! Love you my Foo always ❤️ Can’t wait for the next round 🥊😘 @faroutakhtar photo by @errikosandreouphoto style by @pashamalwani HMU @mallikajolly @azima_toppo shibani’s outfit – @dior Farhan’s shirt @hemantandnandita Trousers @bodicebodice

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on


गेल्या बऱ्याच महिन्यांपासून सेलिब्रिटींच्या या मांदियाळीत फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या जोडीवर अनेकांच्या नजरा खिळलेल्या होत्या. ही जोडी पहिल्यांदाच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने एकत्र माध्यमांसमोर आली आणि ते रिलेशनशिपमध्ये असल्याची बाब उघड झाली.


आता लवकरच फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर ही जोडी विवाहबद्ध होणार आहेत. शिबानी आणि फरहान याचवर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबामध्ये लग्नाची तयारी देखील जोरदार सुरू आहे. पण अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली नाही.


फरहानचा घटस्फोट झाला आहे शिवाय त्याला दोन मुली देखील आहे. त्याच्या पत्नीचे नाव अधुना आहे. २००२ साली त्यांनी विवाह केला होता. १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर शिबानीच्या आधी फरहान अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेट करत असल्याची चर्चा होती. पण दोघांनी कधी त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नाही.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी फरहान आणि शिबानीने केलेली सोशल मीडिया पोस्ट पाहता त्या दोघांचाही साखरपुडा झाल्याच्या चर्चा आहेत. पण, त्या वृत्तालासुद्धा दुजोरा न देण्यात आल्यामुळे आता चाहते आणि साऱ्या कलाविश्वाचे लक्ष या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्यावर लागले आहे.

Leave a Comment