झोपेचा आरोग्यावर सखोल परिणाम


माणसाच्या आरोग्यासाठी काम करणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच चांगली, गाढ, शांत झोप आवश्यक तेवढा वेळ घेणे हेही आवश्यक आहे. झोप कमी मिळाली तर आपल्या आतड्यांवर काही विपरीत परिणाम होतात आणि मेंदूवरही घातक परिणाम होतात. कमी झोप मिळणारा माणूस हा नेहमी चिडचिड करीत असतो कारण त्याच्या मानसिकतेवरही कमी झोपेचा परिणाम झालेला असतो. आजकाल जगभरातच पुरुषांच्या प्रजननक्षमतेत घट होत आहे. जर्मनी सारख्या देशात तर हा मोठाच प्रश्‍न होऊन बसला आहे. हा कमी झोपेचा परिणाम आहे असे निष्कर्ष काही तज्ज्ञांच्या पाहणीतून निघाले आहेत. कमी झोप घेणारांच्या शुक्रजंतुंची संख्या कमी होते. असे दिसते.

शुक्रजंतुंची संख्या आणि प्रत यांच्यावर झोपेचा परिणाम आहे. साधारणत: सात ते साडे सात तास झोप घेणारांच्या वीर्याचे हे दोन्ही गुणधर्म चांगले असतात. पण झोप कमी झाली की दर्जा आणि स्पर्म काऊंट या दोन्हीवरही परिणाम होतो. काही पाहण्यात काही महिलांना गरोदरअवस्थेतच मधुमेह होतो. अशा प्रकारच्या मधुमेहाच्या अनेक कारणांत कमी झोप हेही प्रमुख कारण आहे असे अमेरिकेतल्या इलिनॉईस विद्यापीठातल्या तज्ज्ञ संशोधकांना आढळले आहे. लोकांची झोप कमी का होते याचाही शोध घेण्यात आला तेव्हा असे आढळले की, तणाव हे कमी झोपेचे मुख्य कारण आहे. साखरेचे अती प्रमाण, फास्ट फूड, यामुळेही झोप चांगली लागत नाही. असेही काही तज्ञांचे म्हणणे आहे. आयुर्वेदात निद्रानाशावर किंवा विचलित झोपेवर काही औषधे सागितलेली आहेत.

अश्‍वगंधा, जटामासी, सरपगंधा, वाचा, शंखपुष्पी, ब्राह्मी या वनस्पतींच्या सेवनाने झोपेची समस्या कमी होऊ शकते. या वनस्पतींचे सेवन कसे करावे याची माहिती कोणाही आयुर्वेेदाचार्याकडून घेेता येते. त्यापैकी एक पद्धत अशी आहे. एक चमचाभर ब्राह्मीची पावडर घ्यावी त्यात तेवढीच अश्‍वगंधेची पावडर मिसळावी. हे मिश्रण दोन कप पाण्यात टाकावे आणि हे मिश्रण गॅसवर ठेवून उकळावे. त्यातले निम्मे म्हणजे एक कप पाणी आटून एक कप पाणी उरेपर्यंत उकळावे आणि अशा रितीने तयार झालेला एक कपभर अश्‍वगंधा आणि ब्राह्मी यांचा काढा दिवसातून एकदा घ्यावा. या काढ्याने झोपेची समस्या कमी होते. शांत झोप लागते. कमी झोपेने झालेेले मेंदूचे नुकसान भरून निघते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment