दररोज मधाचे सेवन आरोग्यास हितकारी


मधाचे सेवन आरोग्यास हितकारी आहे हे ज्ञान आपल्याकडे फार प्राचीन काळापासून चालत आलेले आहे. एक मोठा चमचा मधामध्ये सुमारे ६४ कॅलरीज असून, दररोज एक चमचा मध आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्याने त्याचे अनेक फायदे दिसून येतात. मध अँटी ऑक्सिडंट्स ने परिपूर्ण असून, त्याच्या नियमित सेवनाने शरीरातील घातक द्रव्ये लघवीवाटे बाहेर टाकली जातात. सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस घेतल्याने शरीराचा चयापचय (मेटाबोलिक रेट) वाढून वजन घटण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मधात अँटी बॅक्टेरियल तत्वे असून त्याच्या सेवनामुळे त्वचा सुंदर व सतेज बनते.

मधात असणारी साखर ही नैसर्गिक असल्यामुळे कृत्रिम साखर खाण्यापेक्षा मधाचा वापर करणे उत्तम. चहामध्ये, फळांच्या रसांमध्ये, ब्रेडवर जॅम ऐवजी मधाचा वापर करावा. मधाच्या सेवाने शरीरातील कोलेस्टेरोल घटण्यास मदत होते. त्याकरिता दररोज एक ग्लास गरम पाण्यामध्ये मध घालून प्यावे. या उपायामुळे हृदयाच्या धमन्या आकुंचित होऊन त्यामध्ये अडथळा निर्माण होत नाही.

मधाच्या सेवनाने शारीरिक तणाव नाहीसा होऊन शरीरामध्ये उत्साह राहतो. तसेच मधाच्या सेवनाने बुद्धिमत्ता तीक्ष्ण होते. मधात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असून, हे कॅल्शियम शरीरामध्ये त्वरेने शोषले जाते. मधात असलेली नैसर्गिक साखर शरीरामध्ये इन्स्युलीन वाढण्यास मदत करते. त्यामुळे शरीरामध्ये सेरोटोनीन या होर्मोनला चालना मिळते. सेरोटोनीन ला मिळालेली चालना मेलाटोनीन नावाच्या होर्मोनला सक्रीय करते. हा होर्मोन शांत झोप प्रदान करणारा आहे. याच कारणामुळे निद्रानाशाचा विकार असलेल्या व्यक्तींना मधाचे सेवन फायदेशीर ठरते.

मधात अँटी सेप्टिक तत्वे असल्याने याच्या सेवनाने शरीरालच्या आतील घाव किंवा जखमा भरून येण्यास मदत होते. तसेच पोटदुखीचा त्रास होत असताना मधात लसूण मिसळून घेतली असता त्वरित गुण येतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment