घनदाट केस आणि सुंदर पापण्यांसाठी एरंडेल


तुमची त्वचा आणि केस यांची निगा राखण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या सौदर्य प्रसाधानांमध्ये एरंडेलाचा समावेश करणे उपयुक्त ठरेल. घनदाट, काळेभोर केस, आकर्षक भुवया आणि सुंदर पापण्या कोणाला नको असतील? हे सर्व मिळविण्यासाठी एरंडेलाचा उपयोग होतो. एरंडेल केसांना चमकदार तर बनवतेच, पण त्याशिवाय, एरंडेलाच्या वापराने केसांची चांगली वाढ देखील होते. पण एरंडेल काहीसे दाट असल्याने याचे काहीच थेंब खोबरेल तेलामध्ये मिसळून वापरणेही चांगले.

एरंडेलामध्ये असणारे रीसिनोलिक अॅसिड केसांच्या मुळांशी ph लेव्हल संतुलित ठेवते, आणि स्काल्प्मधील नैसार्गिक तेलाच्या अंशामध्ये वृद्धी करते. यामुळे डोके कोरडे पडणे, डोक्यात खाज सुटणे, कोंडा होणे असल्या तक्रारी दूर होण्यास मदत मिळते. आपल्या केसांसाठी आपण जी प्रसाधने वापरात असतो, त्या प्रसाधनांमधील रसायनांमुळे केसांवर विपरीत परिणाम होऊन केस रुक्ष, कोरडे दिसू लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी एरंडेल थोड्याश्या खोबरेल तेलामध्ये किंवा ऑलिव्ह तेलामध्ये मिसळून या तेलाने केसांना मालिश करावी. तासभर हे तेल केसांमध्ये राहू देऊन त्यानंतर नेहमीप्रमाणे एखाद्या सौम्य शॅम्पूने केस धुवून टाकावेत. आठवड्यातून किमान एकदा हे तेल केसांना लावल्यास केस मुलायम, चमकदार आणि दाट होतील.

एरंडेलामध्ये असलेली मुबलक पोषक द्रव्ये आणि फायटोकेमिकल्स भरपूर केसवाढीकरिता मदत करतात. एरंडेलामध्ये प्रथिने आणि फॅटी अॅसिड्स केसांच्या मुळांना पोषण देतात, व भुवया, पापण्या चांगल्या वाढण्यास मदत करतात. या करिता रात्री झोपण्यापूर्वी एक कापसाचा लहान बोळा एरंडेलामध्ये बुडवून भुवयांवर फिरवत एरंडेल लावे. सकाळी उठल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाकावा. पापण्यांना एरंडेल लावण्यासाठी जुन्या मस्कारा ब्रश किंवा टूथब्रश चा वापर करावा. हा उपाय रोज रात्री काही काळासाठी केल्याने भुवयांची व पाण्याची वाढ होताना दिसू लागेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment