झुलन गोस्वामीची व्यक्तिरेखा साकारणार अनुष्का शर्मा


गेल्या अनेक वर्षांपासून कलाविश्व आणि क्रीडाक्षेत्र यांचे विशेष असे नाते असल्यामुळेच बॉलीवूडमध्ये आजपर्यंत अनेक लोकप्रिय खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती झाली. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, धावपटू मिल्खासिंग आणि बॉक्सर मेरी कोम यांच्या सारख्या दिग्गज खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मितीनंतर लवकरच आता एका महिला क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. अभिनेत्री आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अनुष्का शर्मा ‘झीरो’ चित्रपटानंतर या बायोपिकच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार असून यामध्ये झुलनची भूमिका अनुष्का साकारणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या गोलंदाजीचा कणा म्हणून झुलन गोस्वामीला ओळखले जाते.

Leave a Comment