गेलच्या मते सध्याच्या घडीला पाकिस्तान सर्वात सुरक्षित देश


नवी दिल्ली – पाकिस्तानपेक्षा भारतच अधिक असुरक्षित असल्याची मुक्ताफळे काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मनी यांनी उधळली होती. त्यानतंर आता सध्याच्या घडीला पाकिस्तान सर्वात सुरक्षित देश असल्याचे वेस्ट इंडिजच्या एका स्फोटक फलंदाजाने म्हटले आहे.

हे वक्तव्य विंडीजचा फलंदाज ख्रिस गेलने केले असून क्रिकेट खेळण्यासाठी सध्या पाकिस्तान हे जगातील सर्वात सुरक्षित स्थान आहे. आपल्याला जर राष्ट्रपती सुरक्षा मिळेल असे म्हणाले असतील तर, तुम्ही सुरक्षित आहात. आम्ही बांगलादेशातही पूर्णपणे सुरक्षित असल्याचे ख्रिस गेलने पत्रकारांशी चर्चा करताना म्हटले. सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये चटगांव चॅलेंजर्सकडून गेल खेळत आहे.

तब्बल १० वर्षांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायामुळे ठप्प असलेले तेथील क्रिकेट श्रीलंकेच्या दौऱ्यामुळे कसेबसे सुरू झाले. लंकेच्या संघाने या वर्षी झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत दौरा केला. हा दौरा झाल्यानंतर लगेच ‘पीसीबी’चे अध्यक्ष एहसान मनी यांनी पाकिस्तानातील सुरक्षा भारतापेक्षा अधिक चांगली असल्याचे सांगितले होते.

श्रीलंका दौऱ्यानंतर पाकिस्तान आता क्रीडा विश्वासाठी सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीलंका दौरा म्हणजे पाकिस्तान क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. क्रीडा विश्वात पाकिस्तानची प्रतिमा उंचावण्यासाठी मीडिया व चाहत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे एहसान मनी यांनी सांगितले होते.

Leave a Comment