सुगंध अधिक काळ टिकण्यासाठी…


आपलं व्यक्‍तिमत्त्व आकर्षक दिसावं, ते प्रसन्न असावं, अशी बहुतेकांची इच्छा असते. त्यादृष्टीने सुंदर, आकर्षक कपडे, सौंदर्यप्रसाधनांच्या वापरावर भर दिला जातो. याच्या जोडीला परफ्युमचा वापर करण्यावरही भर दिला जातो. परफ्युमचा मंद सुगंध तन-मनाला प्रफुल्लीत करणारा ठरतो.

आजकाल सततची धावपळ, वाढतं उष्णतामान यामुळे अनेकांना घामाच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. त्यात घामाच्या दुर्गंधीमुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना वा ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी बोलताना अडचण निर्माण होते. यावर उपाय म्हणूनही परफ्यूमचा वापर केला जातो.

कोणत्याही प्रकारचा परफ्यूम वापरला तरी त्याचा सुगंध दीर्घकाळ टिकून रहावा, अशीच इच्छा असते. परंतु त्यासाठी काय करावे याची मात्र अनेकांना नेमकी कल्पना असत नाही. खरं तर योग्य ठिकाणी परफ्यूम मारल्यास त्याचा सुगंध अधिक काळ कायम राहू शकतो. या संदर्भातील काही महत्त्वाच्या टीप्स

* परफ्यूमचा सुगंध अधिक काळ टिकण्यासाठी तो डोक्‍यावर मारायला हवा, असं सांगितलं तर आश्‍चर्य वाटेल. परंतु हे खरं आहे. कारण केसांमध्ये मारलेला परफ्युम जास्त काळ टिकू शकतो, असा निष्कर्ष समोर आला आहे. त्यात आणखी एक उपाय म्हणजे कंगव्यावर परफ्युम मारूनही तुम्ही केस विंचरू शकता.

* सर्वसाधारणपणे मानेलगतच्या भागाचे तापमान शरीराच्या इतर भागापेक्षा जास्त असते. त्यामुळे मानेवर परफ्युम मारावा. या ठिकाणी मारलेल्या परफ्यूमचा सुगंध अधिक काळ टिकून राहणं शक्‍य होईल.

* दंडावरही परफ्युम मारता येईल. यामुळे सुगंध बराच काळपर्यंत टिकून राहिल. * खरं तर छातीवरही परफ्युम मारायला हवा. या परफ्युमचा मंद सुगंध बराच काळ टिकून राहिल. * कानांच्या वरच्या भागावरची त्वचा तेलकट असते. त्यामुळे इथंही परफ्युम मारता येईल. कारणं तेलकट त्वचेवर परफ्युम जास्त काळ टिकून राहतो.

* शरीरातील नसा उष्णता बाहेर टाकतात. यामुळे परफ्युमचा सुगंध अधिक काळ टिकून राहतो. मनगटाच्या लगतच्या नसांमुळे हा सुगंध बराच काळ टिकून राहू शकतो. त्यामुळे मनगटावर परफ्युम मारावा.

* बहुतेकजण कपड्यांवर परफ्युम मारतात. कपड्यांवरील परफ्युमचा सुगंधही बराच काळ टिकून राहतो. * कमीत कमी परफ्युम मारा. यामुळे मंद सुगंध दरवळत राहिल. अन्यथा सोबत असलेल्या व्यक्तिकडून तीव्र प्रतिक्रिया मिळतील.

Leave a Comment