सर्वसाधारणपणे रेल्वे स्टेशन आण विमानतळावर वाट पाहत राहणे कंटाळवाणे वाटते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही विमानतळाबद्दल सांगणार आहोत, जे जगातील सर्वात सुंदर विमानतळे आहेत. ही असे ठिकाणे आहेत, जेथे विमानाची वाट पाहणे कंटाळवाणे वाटत नाही.

इंचियॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ –
दक्षिण कोरियातील इंचियॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाही तर येथे थेअटर, म्यूझियम आणि फिरण्यासाठी गार्डन आणि आइस स्केटिंग पार्क देखील आहे. विमानतळाबरोबरच हे एक सुंदर मॉल देखील आहे.

चांगी विमानतळ –
सिंगापूरचे चांगी विमानतळ हे आणखी एक जगातील सुंदर विमानतळ. येथे गार्डन, वॉटरफॉल आणि छोटे छोटे कालवे येथे आहेत. चांगी विमानतळावरच जगातील सर्वात लांब विमानतळ स्लाइड आहे. येथे लॉर्ड्स ऑफ रिंग्स आणि द हॉबिट नावे असलेले थीम पार्क देखील आहेत.

हाँगकाँग विमानतळ –
हाँगकाँग विमानतळ देखील जगातील सर्वात आलिशान विमानतळांपैकी एक आहे. येथे आयमॅक्स सिनेमाहॉल देखील आहे.

क्वालांपूर विमानतळ –
मलेशियामधील क्वालांपूर विमानतळ जगात प्रसिद्ध आहे. या विमानतळावर सर्व सुविधा आहेत.

मॅककेरन आंतरराष्ट्रीय विमानतळ –
लॉस वेगासचे मॅककेरन आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या मूर्तिकला आणि भित्तीचित्रामुळे प्रसिद्ध आहे. येथे रिकाम्या वेळेत प्रवास गॅमलिंग देखील खेळू शकतात.