ऋषभने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर केले ब्लॉक


सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला चर्चेत असते. आपल्या भूमिकांपेक्षा ती तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असते. अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत तिचे नाव जोडण्यात आले होते. दरम्यान भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला उर्वशी डेट करत असल्याची देखील चर्चा रंगली होती. ऋषभने आता उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले आहे.

ऋषभ पंतने सोशल मीडियावर गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबतचा फोटो शेअर करत उर्वशीसोबत असलेल्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लावला असल्यामुळे उर्वशी ऋषभच्या आयुष्यात नसून ईशा आहे हे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील वृत्त स्पॉटबॉय या संकेतस्थळाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार ऋषभला उर्वशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे तिला ऋषभने ब्लॉक केले आहे. परस्पर सामंजस्यने त्या दोघांनी हा निर्णय घेतला असल्याचे उर्वशीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

१० डिसेंबर २०१९ रोजी ११च्या सुमारास उर्वशी आणि ऋषभ पंत डेटवर गेल्याचे म्हटले जात आहे. जुहूमधील ईस्टेला हॉटेलमध्ये हे दोघे एकत्र डिनर करताना दिसले. विशेष म्हणजे टी-20 मॅच सुरु होण्याच्या एक दिवसआधी डिनर डेटवर गेल्याचे पाहायला मिळाले. ते दोघे त्यामुळे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण ऋषभने गर्लफ्रेंड सोबतचा फोटो पोस्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

Leave a Comment