अरेच्चा ! एकाच वर्षात महिलेने दोनदा दिला दोन जुळ्यांना जन्म

फ्लोरिडामधील एका महिलेने एकाच वर्षात दोनदा 2-2 बाळांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. फ्लोरिडातील एलेक्सजँड्रिआ वोलिस्टन नावाच्या महिलने पहिल्यांदा मार्च 2019 मध्ये दोन बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा तिने जुळ्या बाळांना जन्म दिला.

वोलिस्टन म्हणाली की, मला असे वाटत आहे की तिला 2 वेळा जणू काही बक्षीसच मिळाले आहे. मार्चमध्ये जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर वोलिस्टन मे मध्ये पुन्हा गर्भवती झाली. तेव्हाच डॉक्टरांना पुन्हा जुळी बाळ जन्माला येणार असल्याचे सांगितले होते.

वोलिस्टनने सांगितले की, चारही बाळ व्यवस्थित आहेत. डिसेंबरमध्ये प्रिमेच्युर स्थितीत जुळी बाळ जन्माला आली. एकाला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली तर एक बाळ काही दिवस हॉस्टिपटलमध्ये होते.

याआधी देखील वोलिस्टनला एक मुलगी आहे. त्यामुळे त्यांना आता 5 बाळांची काळजी घ्यावी लागणार आहे.

तिने सांगितले की, जुळ्या बाळांना जन्म देण्याविषयी सुरूवातीला भिती वाटत होती. माझे शरीरा बाळांना सांभाळू शकेल की नाही याविषयी भिती होती. मात्र सर्व व्यवस्थित झाले.

ती म्हणाली की, तिच्या आजीने देखील दोनदा जुळ्या बाळांना जन्म दिला होता. मात्र त्या बाळांचा मृत्यू झाला. त्यामुळे वोलिस्टनला वाटत आहे की, आजीनेच तिला ही बाळं गिफ्ट दिली आहेत.

Leave a Comment