इराण म्हणते आमच्याकडून झाली ‘गलती से मिस्टेक’


तेहरान – इराण लष्कराने युक्रेनला जाणारे विमान चुकीने पाडल्याचे मान्य केले असून हा अपघात मानवी चुकांमुळे घडल्याचे इराणच्या लष्कराने मान्य केले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

इराणची राजधानी तेहरानजवळ युक्रेनचे प्रवासी विमान ८ जानेवारीला कोसळले होते. हे विमान तेहरानमधील इमाम खोमेनी विमानतळाजवळच कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील कर्मचाऱ्यांसह सर्व १७६ जणांचा मृत्यू झाला होता. बोईंग कंपनीचे विमान उड्डान घेतल्यानंतर थोड्याच वेळात तेहरानच्या नैऋत्येकडील परांद या भागात कोसळले होते.

८२ इराणी, ६३ कॅनडाचे नागरिक या विमानामध्ये असल्याची माहिती युक्रेनच्या मंत्र्यांनी दिली होती. स्थानिक वेळेनुसार सकाळी ५.१५ ला युक्रेनचे आंतरराष्ट्रीय विमान फ्लाईट ७५२ तेहरान विमानतळावरून उड्डाण घेणार होते. मात्र, एक तास उशिराने विमानाने उड्डाण घेतले होते. युक्रेनची राजधानी कीव येथील बोरीसपील विमानतळावर हे विमान उतरणार होते, मात्र, उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात ते कोसळले होते.

Leave a Comment