स्वदेशी बनावटीचे तेजस ठरले लढाऊ जहाजावर उतरणारे देशातील पहिले विमान


नवी दिल्ली- शनिवारी पहिल्यांदा नौसेनेचे एअरक्राफ्ट कॅरियर आयएनएस विक्रमादित्यवर स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान तेजसने यशस्वीरित्या अरेस्टेड लँडिंग केली. याबाबत माहिती देताना संरक्षण शोध आणि विकास संघटना (डीआरडीओ) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही यशस्वी लँडिंग कमांडर जयदीप मावलंकर यांनी केली. त्यामुळे नौसेनेची ऑन डेक ऑपरेशन क्षमता वाढेल.

या अरेस्टेड लँडिंगनंतर नौसेनेसाठी डबल इंजिन तेजस विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयएनएसवर एखादे स्वदेशी बनावटीचे विमान लँड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 13 सप्टेंबर 2019 ला तेजसने नौसेनेत सामील होण्यासाठी मोठे परिक्षण केले होते. गोव्याच्या किनारपट्टीवरील टेस्ट फॅसिलिटीमध्ये डीआरडीओ आमि एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजेंसीच्या अधिकाऱ्यांनी तेजसची अरेस्टेड लँडिंग केली होती. असे करणारे तेजस देशातील पहिले युद्ध विमान आहे. या युद्ध विमानाला हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजंसीने डिझाइन आणि विकसित केले आहे. तेजस भारतीय वायुसेनेच्या 45 व्या स्क्वाड्रन ‘फ्लाइंग ड्रॅगर्स’ चा भाग आहे.

Leave a Comment