सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मिर कधीही ताब्यात घेऊ


नवी दिल्ली – संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तसा संसदीय संकल्प आपण केलेला आहे. त्याचबरोबर सरकारला पाकव्याप्त काश्मिर हवे असेल तर तो देखील आपलाच होईल. याबाबत सरकारने आदेश दिल्यास लष्कर योग्य कारवाई करले, असे नवनिर्वाचित लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांशी संवाद साधते वेळी म्हटले आहे.

अशाप्रकारे अमानुष कारवाईचा आम्ही आधार घेत नाही. आम्ही अशा घटनांना हाताळण्यासाठी सैन्याचा वापर करतो, असे लष्करप्रमुख नरवणे म्हणाले. पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये दोन निशस्त्र नागरिकांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये त्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. याबाबत ते बोलत होते. लष्करामध्ये सहभागी होण्यासाठी १०० महिलांची पहिली बॅच तयार आहे. ६ जानेवारीपासून त्यांना प्रशिक्षण देणे सुरू झाले आहे.

आपल्यासाठी सियाचीन देखील अत्यंत महत्त्वाचे असून याठिकाणी एक संघटना पश्चिम आणि उत्तर मोर्चांची देखरेख करीत आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या लष्काराच्या काही अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी आल्या होत्या. पण, त्या निराधार असल्याचे समोर आले असल्याचेही लष्करप्रमुख नरवणे म्हणाले.

Leave a Comment