टीक-टॉकला टक्कर देणार फेसबुकचे हे अ‍ॅप

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकला टक्कर देण्यासाठी फेसबुकने मागील वर्षी अमेरिकेत लासो अ‍ॅप लाँच केले होते. आता हे अ‍ॅप समोर आले असून, लवकरच भारतात हे अ‍ॅप कंपनीकडून लाँच केले जाणार आहे. यावर्षी मे महिन्यापर्यंत हे अ‍ॅप भारतीय युजर्ससाठी सादर केले जाईल. यासोबतच कंपनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लासोच्या इंटिग्रेशनसाठी देखील काम करत आहे.

टिकटॉक भारतात लाँच होऊन केवळ 27 महिने झाले आहेत, मात्र आतापर्यंत 25 कोटी लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे.

रिपोर्टनुसार, लासोच्या प्रमोशनसाठी कंपनी अनेक इंफ्लूएंसर्ससोबत काम करत आहे. मागील वर्षी अमेरिकेत लासो लाँच झाल्यानंतर लोकप्रिय ठरले होते. भारतासह इंडोनेशियामध्ये देखील फेसबूक लासो अ‍ॅप लाँच करणार आहे.

लासो अ‍ॅपच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये एक मोठी लायब्रेरी मिळेल. व्हिडीओ एडिटिंग टूलसोबतच अनेक प्रकारचे इफेक्ट्स मिळतील. युजर्सला ट्रेंड्स आणि हॅशटॅगबद्दल देखील माहिती मिळेल.

 

Leave a Comment