दुबईला लोक स्वप्नांचे शहर म्हणतात. कारण येथील सुंदरता प्रत्येकाचे मन आकर्षित करते. येथे एवढ्या गगनचुंबी इमारती आहेत की, जगातील इतर शहरांमध्ये कदाचितच पाहायला मिळतील. या शहराविषयी असलेल्या खास गोष्टी जाणून घेऊया.

सर्वसाधारणपणे भारतातील पोलीस जीप, बोलेरो आणि स्कॉर्पियो यासारख्या गाड्यांचा वापर करतात. तर दुबई पोलिसांकडे लॅम्बोर्गिनी, फेरारी आणि बेंन्टले सारख्या कोट्यावधीच्या गाड्या आहेत.

दुबईत पत्त्याची सिस्टम नाही. येथे जिप कोड, एरिया कोड आणि पोस्टल कोड असे काहीही नाही. सर्वकाही ऑनलाईन आहे.

सर्वसाधारणपणे एटीएममधून कागदी नोटा निघतात. मात्र दुबईमधील काही एटीएममधून चक्क सोने बाहेर येते.

येथील कोणतीही गोष्ट स्काय लेव्हलची बनवली जाते. येथे काही ग्राउंड देखील इमारतीवरती आहेत.

दुबई मॉल जगातील सर्वात मोठे शॉपिंग सेंटर आहे. येथे 1200 पेक्षा अधिक स्टोर आहेत.

एकेकाळी दुबई हे एक सुनसान असे, वाळवंट होते. मात्र आज येथे उंचच उंच इमारती आहेत.

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफा दुबईतच आहे. सांगण्यात येते की, सर्वात उंच इमारतीमध्ये राहणारे लोक सुर्याला अधिक काळ पाहू शकतात. त्यामूळे त्यांना चंद्र खूप उशीरा दिसतो. 828 मीटर उंच बुर्ज खलीफाला तुम्ही 90 किमी अंतरावरून देखील पाहू शकता.

दुबईमध्ये केवळ इमारतीतच नाही तर प्रवाशांची सोयीसाठी बस स्टँडवर देखील एसी लावण्यात आला आहे.

दुबईतील लोक कुत्रे-मांजर पाळण्या ऐवजी सिंह आणि चित्ता पाळतात. ते लोक सहज या प्राण्यांबरोबर राहू शकतात.