दिव्यांग व्यक्तीच्या ई-बाईकवर आनंद महिंद्रा फिदा; केली मोठी घोषणा

जेथे इच्छा असते, तेथे मार्ग असे म्हटले जाते. काहीसे असेच सुरतमध्ये राहणाऱ्या 60 वर्षीय विष्णू पटेलसोबत झाले आहे. लहानपणी पोलिओचे शिकार झालेले विष्णू पटेल व्यवस्थित चालू शकत नाही. मात्र त्यांनी मोटारसायकल, लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या बॅटरीने ई-बाईक बनवली आहे. विष्णू पटेल यांची ही आयडिया उद्योगपती आनंद महिंद्रा यांना देखील आवडली आणि त्यांनी विष्णू पटेल यांना मदतसोबतच एक कोटी रुपयांचा फंडची देखील घोषणा केली.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी विष्णू पटेल यांच्याबद्दल केलेले ट्विट रिट्विट करत लिहिले की, शानदार स्टोरी, मी विष्णू पटेल यांच्याशी संपर्क करेल व पाहिल की त्यांचे वर्कशॉप अपग्रेड करण्यासाठी मी काही गुंतवणूक करू शकतो की नाही. त्यांनी मला प्रेरणा दिली की मी देशातील छोट्या उद्योजकांसाठी 1 कोटींचा फंड गुंतवू. खूप प्रतिभा आणि इनोव्हेशनला ओळख मिळण्याची वाट पाहत आहे.

ही बाईक बनविण्यासाठी विष्णू पटेल यांनी कोणतीही ट्रेनिंग घेतलेली नाही. ते जास्त शिकलेले देखील नाहीत. त्यांना जास्त ऐकायला देखील येत नाही. तरी देखील या सर्वांवर मात करत त्यांनी एका छोट्याशा खोलीत ई-बाईक बनवली. त्यांचे कुटूंब कॉपर वायर ड्राइंग डाईजचा व्यावसाय करते.

 

Leave a Comment