एफआयआर आणि झिरो एफआयआरमध्ये काय फरक आहे घ्या जाणून

एफआयआरबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र तुम्ही कधी झिरो एफआयआरबद्दल ऐकले आहे का ? झिरो एफआयआर काय आहे व कोणत्या प्रकारात याची नोंद होते, त्याविषयी जाणून घेऊया.

एफआयआर –

एफआयआर म्हणजेच फर्स्ट इंफॉर्मेंशन रिपोर्ट एक प्रकारचा कायदेशीर कागदपत्रे आहेत, ज्याच्या आधारावर पोलीस कारवाई करतात. गुन्ह्याची नोंद करण्यासाठी पोलिसांकडे दिलेली प्राथमिक माहिती म्हणजे एफआयआर. एफआयआरमध्ये पोलीस आरोपीला विना वॉरंटचे अटक करू शकतात. हे केवळ हत्या, वाईट कृत्य, चोरीस हल्ला इत्यादी घटनांमध्ये दाखल होते.

एनसीआर म्हणजे काय ?

शिवीगाळ यासारख्या घटनांमध्ये पोलीस विना वॉरंटचे आरोपीला अटक करू शकत नाही. अशा केसला आधी न्यायादंडाधिकाऱ्याकडे पाठविले जाते. अशा प्रकरणात एनसीआर (नॉन कॉग्निजेबल रिपोर्ट) दाखल होते.

एनसीआर आणि एफआयआरमधील फरक –

जर तुमचे सामान चोरी झाले असेल तर एफआयआरची नोंद होईल व जर सामान हरवले असेल तर एनसीआरची नोंद होईल. एफआयआरची नोंद झाल्यानंतर पोलीस दोषींना शिक्षा देण्यासाठी कारवाई सुरू करतात. कोणत्याही घटनेनंतर एफआयआर दाखल करणे गरजेचे आहे.

झिरो एफआयआर म्हणजे काय ?

सर्वसाधारणपणे एफआयआर घटनास्थळाजवळीलच स्टेशनमध्ये दाखल करणे गरजेचे आहे. मात्र जर पिडितला काही कारणास्तव बाहेरील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागल्यास, नंतर ती तक्रार संबंधित स्टेशनला ट्रांसफर केली जाते. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातूनच ही तक्रार ट्रांसफर होते. म्हणजेच घटनास्थळाच्या सीमेपेक्षा वेगळ्या भागातील स्टेशनमध्ये प्राथमिक तक्रार दाखल केली जाते, त्याला झिरो एफआयआर म्हणतात. झिरो एफआयआरला NIL FIR देखील म्हणतात.

कशी दाखल कराल झिरो एफआयआर –

जर तुम्ही झिरो एफआयआर दाखल करत असाल तर यासाठी तुम्हाला स्वतः स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही. एखादा नातेवाईक अथवा साक्षीदार देखील याची नोंद करू शकतो. यामध्ये घटनेच्या तारखेसोबत वेळ आणि आरोपीची माहिती असणे गरजेचे आहे. एफआयआरमध्ये एक क्राइम नंबर असतो, ज्याचा वापर भविष्यात रेफ्रेंस म्हणून केला जाऊ शकतो.

Leave a Comment