अमेरिकेच्या लॉस वेगास येथे सुरू असलेल्या कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो 2020 मध्ये आतापर्यंत स्मार्ट डायपरपासून ते शेपूट असलेला रोबॉट देखील सादर करण्यात आले आहेत. आता येथे गोल स्क्रीन असलेला स्मार्टफोन लाँच झाला आहे. या फोनचे नाव सर्कल फोन (Cyrcle Phone) आहे.
हा फोन अमेरिकन स्टार्टअप कंपनी डीटूरने सादर केला आहे. सर्कल फोन जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यात दोन हेडफोन जॅक देण्यात आलेले आहेत.

या फोनमध्ये 2 सिम कार्ड वापरता येतील. याशिवाय यात सेल्फीसाठी देखील कॅमेरा देण्यात आलेला आहे. फोनमध्ये एलईडी डिस्प्ले आहे. मात्र याच्या साइजबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. दोन हेडफोन जॅक असल्याने एकाच वेळी दोन लोक गाणी ऐकू शकतात. फोनमध्ये अँड्राईड पाय 9.0 देण्यात आलेला आहे.
फोनमध्ये फ्रंटला 13 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. रिअर कॅमेऱ्याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. या फोनमध्ये अॅप आयातआकारात ओपन होत आहेत, त्यामुळे काही अॅप दिसत नाहीत. कंपनी या अॅपच्या गोल डिझाईनवर काम करत आहेत. याच्या किंमतीबद्दल अद्याप कंपनीने सांगितलेले नाही.