‘छपाक’ला ‘तान्हाजी’ची धोबीपछाड


बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर या शुक्रवारी खूप मोठी टक्कर पाहायला मिळाली. दीपिकाच्या ‘छपाक’ चित्रपटातसोबत अजय देवगनचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाची चांगलीच टक्कर झाली. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोन्ही चित्रपट चर्चेत होते. या दोन्ही चित्रपटांची तगडी स्टार कास्ट आणि उत्तम कथानक ही बलस्थाने असल्यामुळे प्रदर्शनानंतर कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले याची माहिती देखील घ्यायला हवी.

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने लक्षवेधी कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 16 करोड रुपयांची कमाई केली. त्याचबरोबर या चित्रपटांना थोडे राजकीय वलय देखील निर्माण झाले होते. दोघांनाही याचा फायदा आणि फटका झाला आहे. भाजपचे अनेक नेते अजय देवगनच्या समर्थनाकरता मैदानात उतरले होते.

अजय देवगनचा हा चित्रपट खूप खास असल्याचे म्हटले जात आहे. हा अजय देवगनचा 100 वा चित्रपट आहे. या चित्रपटाकरिता अजयने प्रचंड मेहनत केली आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि काजोल हे प्रमुख भूमिकेत आहेत. बॉक्स ऑफ इंडियानुसार दीपिकाच्या ‘छपाक’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4.5 करोड रुपयांची कमाई केली आहे. ‘छपाक’ चित्रपट राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. या चित्रपटाला काँग्रेसद्वारे समर्थन मिळत आहे.

Leave a Comment