जर्मनीच्या कॉलोग्ने येथे जन्म झालेल्या 7 वर्षीय मुलाद्वारे तयार करण्यात आलेल्या एका स्टार फुटबॉलरची पेटिंग तब्बल 8.51 लाखांना विकली गेली आहे. ही पेटिंग खरेदी करण्यासाठी जगभरातून लोक बर्लिन येथील लिलावात पोहचले होते.

2012 मध्ये जन्म झालेल्या मिकाइल अकारने 4 वर्षांचा असल्यापासून पेटिंग बनविण्यास सुरूवात केली. आपल्या कलेमुळे मिकाइल जगभरात लोकप्रिय झाला आहे. जर्मन मीडिया देखील त्याला प्रि स्कूल ‘पिकासो’ म्हणतात. मिकाइलला मोठे होऊन प्रोफेशन फुटबॉलर बनायचे आहे.
त्याच्या वडिलांनी सांगितले की, 4 वर्षांचा असतानाच त्याने सुंदर पेटिंग काढली होती. मला वाटले पत्नीने पेटिंग बनवली, मात्र मिकाइलच्या दुसऱ्या व तिसऱ्या पेटिंगने स्पष्ट केले की, तो एक शानदार कलाकार आहे. काही दिवसांपुर्वीच त्याने जर्मनीचा स्टार फुटबॉलर मॅन्युअल नॉयरची पेटिंग बनवली होती. ती 8 लाखात विकली गेली. ही रक्कम चॅरिटीला देण्यात आली.
मिकाइलचे स्वतःचे इंस्टाग्राम अकाउंट देखील असून, त्याचे 40 हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.