टायनी टी टू, जगातला छोटा ३ जी स्मार्टफोन


फोटो सौजन्य जागरण
युकेच्या झिनी मोबाईल या कंपनीने जगातील सर्वात छोटा ३ डी स्मार्टफोन सादर केला असून त्यासाठी किकस्टार्टर कँपेन सुरु केले आहे. या फोनचे वजन केवळ ३१ ग्रॅम असून कँपेन पेजवर या फोन संदर्भात काही डीटेल्स दिले आहेत. या फोनचे नामकरण टायनी टी टू असे केले गेले असून झँको टायनी टू स्मार्टफोन मध्ये मिळणारी बहुतेक सर्व फंक्शन्स यात मिळतील. या फोनचे शिपिंग एप्रिल २०२० पासून सुरु होणार आहे.

या फोनमध्ये कॅमेरा, व्हिडीओ रेकॉर्डिंग, एमपी ३, एमपी ४, प्ले बॅक, गेम्स, कॅमेरा, एफएम रेडीओ, कॉल करणे, टेक्स्ट मेसेज अश्या सर्व सुविधा युजरला मिळतील. शिवाय यात ३२ जीबी स्टोरेज वाढविणारा मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला गेला आहे. युके, युएस, इंडिया, चीन, जपान, जर्मनी व नेदरलँड्स मध्ये ग्राहकाला फ्री शिपिंग केले जाणार आहे. ग्राहकाला सुपर अर्ली बर्ड रीवॉर्ड मध्ये हा फोन केवळ ५९ डॉलर्स म्हणजे ४२०० रुपयात मिळणार आहे. अन्यथा त्याची किंमत ७९ डॉलर्स आहे.

एकवेळच्या पूर्ण चार्जिंगवर हा फोन सात दिवसाचा स्टँडबॅक टाईम देईल. या फोनमध्ये अनेक बिल्ट इन अॅप्स आहेत. त्यात कॅलक्यूलेटर, फाईल मेकर, टास्क मॅनेजर, नोटपॅड यांचा समावेश आहे. युजर त्याची आवडती गाणी यात स्टोर करू शकणार आहे.

Leave a Comment