महिलांच्या सुरक्षेसाठी या पठ्ठ्याने तयार केली ‘लिपस्टिक गन’

महिलांच्या प्रति वाढते गुन्हे रोखण्यासाठी वाराणसीच्या श्याम चौरसिया नावाच्या एका युवा वैज्ञानिकाने महिलांसाठी खास उपकरण तयार केले आहे. श्यामने ‘लिपस्टिक गन’ तयार केली आहे. याच्या माध्यमातून महिला लिपस्टिकमधून गोळी चालवण्याबरोबरच पोलिसांना देखील त्वरित संपर्क साधू शकतात.

श्यामने सांगितले की, तो अशोका इंस्टिट्यूटमध्ये पार्ट टाइम नोकरी करतो. त्याने या आधी देखील महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपकरणे तयार केली आहेत. मात्र लिपस्टिक गन फायदेशीर ठरू शकते. या बंदुकीचे संपुर्ण नाव ‘स्मार्ट एंटी टीजिंग लिपस्टिक गन’ आहे. दिसायला ही बंदुक पुर्णपणे लिपस्टिक प्रमाणे आहे. मात्र छेड काढणाऱ्या गुंडांना धडा शिकवण्यासाठी पूरक आहे.

त्याने सांगितले की, या बंदुकीत एक ट्रिगर असून, जो बुंदक चालल्यावर जोरात आवाज करतो. याचा आवाज एक किलोमीटरपर्यंत ऐकू येतो. जर एखादी महिला अडचणीत असेल तर या आवाजने लक्ष वेधता येते. लिपस्टिकमधील फायर ट्रिगर दाबल्यावर लाईव्ह लोकेशनसह पोलीस कंट्रोल नंबर 112 आणि कुटुंबातील सदस्यांना फोन जातो. पोलीस येईपर्यंत महिला लिपस्टिक गनद्वारे फायरिंग करून स्वतःचा बचाव करू शकतात.

ही बंदुक तयार करण्यासाठी 6 महिने लागले. बंदुक बनविण्यासाठी 3.7 प्वाइंट बॅटरी आणि ब्लूटूथचा प्रयोग करण्यात आला. एकदा चार्ज केल्यावर बंदुक अनेक दिवस चालते. यासाठी 650 रुपये खर्च आला. याचे वजन 70 ग्रॅम आहे. बंदुक ब्लूटूथ कनेक्टेड आहे.

त्यांनी सांगितले की, या लिपस्टिकमध्ये दोन माइक आहेत. ज्याच्या माध्यमातून महिला व आजुबाजूच्या लोकांचा आवाज स्पष्ट ऐकू येतो.

Leave a Comment