या अ‍ॅपद्वारे महिला करू शकणार लैंगिक छळाच्या तक्रारी

भारतात आता महिला लैंगिक छळाच्या तक्रारी अ‍ॅपद्वारे करू शकणार आहेत. यासाठी आता पोलीस स्टेशनच्या चक्करा माराव्या लागणार नाहीत. या अ‍ॅपचे नाव स्मॅशबोर्ड (Smashboard) असे आहे. या अ‍ॅपद्वारे महिलांना कायदेशीर मदत मिळेल आणि सोबतच मेडिकल सुविधा दिली जाईल.

स्मॅशबोर्ड हे अ‍ॅप पुर्णपणे प्राइव्हेट आणि इंक्रिप्टेड आहे. या अ‍ॅपद्वारे लैंगिक छळ झालेल्या महिला फोटो, स्क्रीनशॉट, काही कागदपत्रे, व्हिडीओ आणि ऑडिओ पुरावे सेव्ह करू शकतात. ही माहिती या अ‍ॅपचे सह-संस्थापक  नुपूर तिवारी यांनी दिली.

तिवारी यांच्यानुसार स्मॅशोबोर्ज अ‍ॅप युजर्सचे लोकेशन ट्रॅक करणार आहे. सोबतच डेटासोबत कोणतीही छेडछाड करणार नाही.

Leave a Comment