तुमच्या खिशातच आहे तुमच्यावर पाळत ठेवणारा गुप्तहेर

आज स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक कामे सोपी झाली आहेत. या स्मार्टफोनमध्ये बँक खात्यापासून ते अनेक खाजगी माहिती असते. मात्र विचार करा जर या स्मार्टफोनमध्ये हॅकरने स्पायवेअर इंस्टॉल केला व तो तुमचा फोन कंट्रोल करत असेल तर ?

हॅकर तुमचे संभाषण ऐकू शकतात, तुम्हाला जीपीएसद्वारे देखील ट्रॅक करू शकतात. हॅकर्स स्पायवेअरद्वारे तुम्ही वापर असलेल्या अ‍ॅपमध्ये शिरू शकतात. तुमचे फोटो, संपर्क, कॅलेंडरमधील सूचना, ईमेल आणि कागदपत्रे सर्वांपर्यंत हॅकर पोहचू शकतात. प्रवासादरम्यान हे सॉफ्टवेअर डेटा पकडू शकत नाही. मात्र जेव्हा हे स्थिर असते त्यावेळी सर्व फंक्शनवर याचे नियंत्रण असते.

मे 2019 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मोठी त्रुटी आढळली होती. या अ‍ॅपद्वारे हॅकर्स सहज फोनमध्ये शिरकाव करू शकत होते. एकदा अ‍ॅप उघडल्यावर स्पायवेअर आपोआप फोनमध्ये डाउनलोड होत असे. युजर्सला यासाठी क्लिक देखील करायची गरज नसते. याला झिरो क्लिक टेक्नोलॉजी म्हणतात. यानंतर आपल्या सर्व युजर्ससाठी नवीन अपडेट जारी केले होते.

मॅक्सिकोचा ड्रग माफिया अल चापोला देखील मॅक्सिको अधिकाऱ्यांनी स्पायवेअरच्याच मदतीने पकडले होते.

या प्रकारचे स्पायवेअर बनविण्यासाठी खास एस्पोर्ट लायसन्सची गरज असते. याचा एकमेव उद्देश गंभीर गुन्हेगारांना पकडणे हा असतो. मात्र  अनेक देशातील सरकारने देखील याचा गैरवापर केलेला आहे. शस्त्रांप्रमाणे सॉफ्वेअर विकल्यानंतर त्याची जबाबदारी डेव्हलपर्सची असते. डिजिटल हेरगिरीच्या बाबतीत इस्त्रायलची कंपनी एसएसओ ग्रुप अग्रेसर आहे.

कायदेशीर डिजिटल हेरगिरी उद्योगाचा उद्देश असे स्पायवेअर तयार करणे आहे जे 100 टक्के पकडले जाणार नाही. जर हे शक्य झाले तर याचा चुकीचा वापर झाला आहे की नाही हे समजणारच नाही. यानंतर सर्वकाही डेव्हलपर्सच्या हातात असेल. भविष्यातील सर्वात मोठा धोका हा स्पायवेअरचाच आहे.

Leave a Comment