… म्हणून या मुलीने 35 वर्ष जुन्या व्हॅनलाच बनवले घर

भाड्याच्या घरात राहताना भाडे आणि विजेचे बिल वाढतच जात असते. अशा वेळी अनेकजण याला वैतागतात. मात्र स्कॉटलँडमधील एका तरूणीने यावर खास उपाय शोधला आहे. 25 वर्षीय कॅटलिन मॉनेने वाढणारे भाडे आणि वीज बिलाला वैतागून एका व्हॅनलाच आपले घर बनवले आहे.

स्कॉटलँडच्या पेस्ले शहरात राहणाऱ्या कॅटलिनने यासाठी 3 हजार पाउंडमध्ये 35 वर्ष जुनी एक व्हॅन खरेदी केली आण त्याला रेनोव्हेटकरून चालत्या-फिरत्या घरात बदलले.

कॅटलिनने सांगितले की, मी अनेक दिवसांपासून भाड्याच्या घरात राहत आहे. अनेकदा असे व्हायचे की केवळ झोपण्यासाठीच घरी जात असे. कारण पुर्ण दिवस कॉलेज आणि कामातच जात असे. त्यामुळे महिन्याला 250 पाउंड (जवळपास 23 हजार रुपये) वाया जात असे. केवळ काही तास झोपण्यासाठी घरी जावे लागे.

तिने सांगितले की, व्हॅनला घर बनविण्याची आयडिया मैत्रिणीमुळे आली. जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा व्हॅनला घर बनवले. आता मी यात छोटेसे किचन तयार करेल. व्हॅन भलेही जुनी असेल, मात्र चालते.

मागील ऑगस्टमध्ये ती आपल्या पाळीव कुत्र्याबरोबर दोन आठवड्यांसाठी नेदरलँड्सला गेली होती. दोन आठवड्यांच्या या ट्रिपमध्ये गाडी एकदा खराब झाली.

तिने सांगितले की, यावर्षी पदवी घेतल्यानंतर व्हॅनद्वारे सर्वात प्रथम स्कॉटलँड, नंतर इंग्लंड आणि युरोप फिरणार आहे. कुटुंबाला मी आयुष्यभरासाठी या व्हॅनमध्ये शिफ्ट होईल याविषयी शंकाच आहे, मात्र बॉयफ्रेंडाला याने काहीही अडचण नाही.

Leave a Comment