सलमान केली आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा


बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने आपल्या आगामी २०२१ मधील ईदला रिलीज होणाऱ्या चित्रपटाची घोषणा केली असून त्याने याबाबत केलेल्या ट्विटमध्ये चित्रपटाचे शीर्षक ‘कभी ईद कभी दिवाली’ असे असल्याचे म्हटले आहे. आपल्या या आगामी चित्रपटाची घोषणा सलमान खानने ट्विटरवर केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहेत.


अलिकडे सलमानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट रिलीज झाला होता. यात सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर यांची प्रमुख भूमिका होती. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट चांगली कमाई करुन गेला. सलमानचा पुढील चित्रपट ‘राधे’ आहे. याचे दिग्दर्शन प्रभूदेवा करीत आहेत. यंदाच्या ईदला हा चित्रपट रिलीज होणार आहे. यावर्षी अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपटही ईदला प्रदर्शित होणार आहे. सलमानचे चित्रपट ईदला प्रदर्शित होत असतात. बजरंगी भाईजान, किक, एक था टायगर, बॉडिगार्ड, सुल्तान हे चित्रपट ईदला रिलीज झाले होते आणि तुफान गाजले होते.

Leave a Comment