ट्रोलर्सला रोखण्यासाठी ट्विटर आणत आहे हे खास फीचर

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरच एक खास फीचर लाँच करणार आहेत. या फीचरद्वारे युजर्स आपल्या पोस्टवर येणारे रिप्लाय कंट्रोल करू शकतील. म्हणजेच तुमच्या पोस्टवर कोण रिप्लाय करणार आणि कोण नाही हे तुम्ही ठरवू शकाल. याचा फायदा ट्रोलर्सला कंट्रोल करण्यासाठी होईल.

अमेरिकेच्या लॉस वेगासमध्ये सुरू असलेल्या कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो (सीईएस-2020) मध्ये कंपनीने या फीचरबद्दल माहिती दिली आहे.

ट्विटरचे प्रोडक्ट मॅनेजमेंटचे डायरेक्टर सुजान शी यांनी सांगितले की, ट्विटरवर कामाची व चांगली चर्चा करणारे लोक आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आम्ही ही चर्चा सशक्त करण्यासाठी मदत करत आहोत. या फीचरद्वारे युजर्सकडे आपल्या ट्विटवर येणारे रिप्लाय हाइड करण्याची सुविधा असेल. यासाठी युजर्सला स्टेटमेंट, पॅनेल, ग्रुप आणि ग्लोबल हे चार पर्याय मिळतील.

स्टेटमेंट पर्याय निवडल्यावर ट्विटवर कोणीही रिप्लाय करू शकणार नाही. पॅनेलमध्ये निवडलेल्या युजर्सच रिप्लाय करू शकतील. ग्रुप पर्यायामध्ये तुम्ही ज्यांना फॉलो करता तेच रिप्लाय करू शकतील व ग्लोबल पर्याय निवडल्यावर त्या पोस्टवर कोणीही रिप्लाय करू शकेल.

Leave a Comment