कपाट पडल्याने झाला होता बाळाचा मृत्यू, कंपनी देणार 331 कोटींची भरपाई

जगातील मोठी फर्निचर रिटेलर कंपनी आइकियाच्या कपाटाखाली दबून एका चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात कंपनी आइकियाने या लहान बाळाच्या पालकांना 331 कोटी रुपये भरपाई देण्यास तयार झाली आहे.

2017 साली कॅलिफोर्नियातील जोसेफ डडेक या 2 वर्षी बाळाच्या वरती कपड्यांचे कपाट पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या लहानग्याच्या आई-वडिलांचे नाव जोलिन आणि क्रेग डडेक आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही कधी विचारच केला नव्हता की 30 इंच ड्रेसर पडल्याने आमच्या 2 वर्षीय बाळाचा जीव गुदमरेल. नंतर समजले की कपाटाचे डिझाईनच अस्थिर होते व सुरक्षा मानकांची काळजी घेण्यात आली नाही. अशी घटना अनेक बाळांसोबत घडू शकते.

वर्ष 2016 मध्ये देखील आइकियाने तीन परिवारांना 360 कोटी रुपयांची भरपाई दिली होती. या कुटुंबातील बाळांवर देखील अशाच प्रकारे कपाट पडले होते व त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनानंतर कंपनीने 32 किलो वजनाचे सर्व लाखो कपाटे परत मागवली होती. आइकिया कंपनीची स्थापना 1943 ला फिडोर इंगवार कॅम्प्रेड यांनी केली होती.

Leave a Comment