अमेरिकेला आव्हान देणाऱ्या इराणाचे काय आहे लष्करी सामर्थ्य ?

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. इराणने याचा बदला घेत इराकमधील अमेरिकन सैन्य स्थळांवेर हल्ला केला. तेव्हापासूनच या दोन्ही देशांमध्ये युद्ध होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काय इराणकडे असे शस्त्रास्त्र आहेत का ज्याद्वारे ते अमेरिकेला युद्धात पराभूत करू शकतील ? याविषयी जाणून घेऊया.

ब्रिटनच्या इंटरनॅशनल इंस्टिट्यूट फॉर स्ट्रॅटजिक स्टडिजनुसार, इराण जवळ जवळपास 5 लाख 23 हजार सक्रिय सैनिक आहेत. यात इराणचे एलीट फोर्स इस्लामिक रिवॉल्युशनरी गार्ड्सच्या दीड लाख सैन्याचा समावेश आहे. या व्यतरिक्त इराणकडे 20 हजार रिवॉल्युशनरी गार्ड्सचे नौदलातील जवान आहेत. या जवानांना होर्मुझ सामुद्रधुनीजवळ तैनात करण्यात आले आहे. 40 वर्षांपुर्वी स्थापन झालेले रिवॉल्युशनरी गार्ड्स इराणचे सर्वात मजबूत सैन्य संघटन आहे.

Image Credited – Amarujala

रिवॉल्युशनरी गार्ड्सने परदेशात ऑपरेशन्स पार पाडण्यास कुद्स फोर्सची निर्मिती केली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेलेले जनरल सुलेमानी याच फोर्सचे प्रमुख होते. या फोर्समध्ये जवळपास 5 हजार सैन्य आहेत. कुद्स फोर्स लेबनानमध्ये हिजबुल्लाह आणि फिलिस्तीनमध्ये हमासला मदत करते. या व्यतरिक्त अनेक दहशतवादी संघटना इराणला समर्थन देतात.

Image Credited – Amarujala

इराणजवळ मध्यम आणि कमी अंतराची घातक क्षेपणास्त्रे आहेत. ज्यातील अनेक क्षेपणास्त्र इस्त्रायलवर देखील निशाणा साधू शकतात. अमेरिकेवर थेट हल्ला करू शकेल असे एक शस्त्र इराणकडे नाही. इराण सध्या अंतराळासाठी रॉकेटचे देखील परीक्षण करत आहे. अमेरिका आणि अन्य देशांबरोबर झालेल्या अणुबॉम्ब करारानंतर इराणने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे निर्माण करणे बंद केले. मात्र करार तुटल्यानंतर पुन्हा याची निर्मिती सुरू झाली आहे.

Image Credited – Amarujala

इराणकडे शक्तिशाली ड्रोन आहेत, ज्याचा वापर त्यांनी सीरियामध्ये आयएसआयएसवर देखील केला आहे. 2019 मध्ये सौदीची पेट्रोलियम कंपनी अरामकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्याला देखील इराणला जबाबदार धरण्यात आले होते.

Image Credited – Amarujala

इराणने 2010 साली शक्तीशाली सायबर फोर्सची निर्मिती केली आहे. रिवॉल्युशनरी गार्ड्सकडे वेगळे सायबर कमांड आहे. इराण आखाती देशांमध्ये सत्तेसोबत संघर्ष करणाऱ्या विद्रोही गटांना समर्थन देते. यामुळे त्यांनी मध्य-पुर्वमध्ये मोठे नेटवर्क तयार केले आहे.

Leave a Comment