आता जुन्या गाड्यांमध्ये देखील लागणार ‘हाय सिक्यूरिटी’ नंबर प्लेट

नवीन गाड्यांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट 1 वर्षांपासून लावली जात आहे. परिवहन विभागानुसार आता जुन्या गाड्यांमध्ये देखील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली जाणार आहे. याच्या सुचना विभागीय परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचे काम वाहन डीलर्सच करतील. यासाठी वाहन डीलर्सला स्वतःचे ऑनलाईन पोर्टल सुरू करावे लागेल. जर जिल्ह्यात डीलरशीप नसेल तर जवळच्या जिल्ह्यात देखील नंबर प्लेट लावता येईल. वाहन डीलरच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आरटीओचे वाहन 4.0 सॉफ्टवेअरच्या मदतीने वाहनाची माहिती मिळेल.

वाहनाच्या मालकाद्वारे देण्यात आलेली माहिती सॉफ्टवेअरवर उपलब्ध असलेल्या माहितीशी जुळत नसल्यास, त्वरित ही माहिती डीलर, अर्जदार आणि ऑनलाईन पोर्टलला दिली जाईल. सोबतच आरटीओमध्ये माहिती अपडेट करण्यास सांगण्यात येईल.

हाय सिक्युरिटी प्लेट चलान, एफआयआर अथवा हफ्ते बाकी असलेल्या वाहनाला लावता येणार नाही.

Leave a Comment