डोनाल्ड ट्रम्प यासाठी मागत आहेत शांततेचा नोबेल पुरस्कार


वॉशिंग्टन : आपल्या वक्तव्यांमुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेत असतात. अमेरिकेत यावर्षाच्या शेवटी अध्यक्षपदाची निवडणुक असल्यामुळे निवडणुक प्रचारालाही त्यांनी सुरूवात केली आहे. अमेरिकेन लष्कराने इराणचा दुसऱ्या क्रमांकाचा लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी याला ठार केल्यामुळे हा मुद्दा डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीच्या प्रचारातही उपस्थित करत आहेत. ट्रम्प म्हणाले, ड्रोन हल्ल्यात सुलेमानीला ठार करण्याचा आदेश देऊन मी अमेरिकेला वाचवल्यामुळे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी माझी निवड केली पाहिजे. या कामगिरीमुळे मी या पुरस्कारासाठी पात्र असल्याचेही ते म्हणाले.

ट्रम्प पुढे म्हणाले, हा पुरस्कार आत्तापर्यंत मला मिळालेला नाही. 2019 चा शांततेचा नोबेल पुरस्कार इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना मिळाला होता. ते त्याचा संदर्भ देत म्हणाले, माझी निवड आता करणे योग्य राहिल. तर डेमोक्रॅटिक पक्षाने सुलेमानीला टार्गेट करण्याच्या निर्णयावरून ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

ट्रम्प पुढे म्हणाले, आम्ही इराणविरुद्ध आणखी कठोर निर्बंध लादणार आहोत. आखाती देशांच्या तेलाची आम्हाला गरज नाही. दहशतवादाला इराण खतपाणी घालत होते आणि कासिम सुलेमानी हा त्यांचा नायक असल्यामुळेच त्याला आम्ही ठार केले असा खुलासा त्यांनी केला. इराणविरुद्धच्या लढाईत सगळ्या युरोपीयन देशांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment