बापरे ! मांजरीला वाचवण्यासाठी आजीबाईंनी लढवली धक्कादायक शक्कल

सोशल मीडियावर एका थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये चीनमधील एका आजीबाईंनी पाळीव मांजरीला वाचवण्यासाठी 7 वर्षीय नातूला दोरीला बांधून 5 व्या मजल्यावरून उलटे लटकवल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना चीनच्या सिचुआन प्रांतातील पेंगटन काउंटी येथे घडली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक महिलेवर टीका करत आहेत. लोक महिलेला विचारत आहेत की, एका मांजरीला वाचवण्यासाठी चिमुरड्याचे प्राण का धोक्यात टाकले ?

महिलेची मांजर दोन मजले खालील बाल्कनीत अडकली होती. त्यामुळे आजीने नातवाला मजबूत दोरीने बांधले व 5व्या मजल्यावरून खाली लटकवले. जेणेकरून तो मांजरीला वाचवू शकेल. मुलगा दोरीच्या मदतीने खाली उतरून मांजरीला उचलतो व त्यानंतर आजी मुलाला वरती ओढून घेते. खाली उभे असलेले लोक देखील महिलेला सावध राहण्यास सांगत होते.

केवळ 10 मिनिटात ही संपुर्ण घटना घडली. जेव्हा स्वतः आजीने तो व्हिडीओ पाहिला तेव्हा त्या देखील घाबरल्या. त्या म्हणाल्या की पुन्हा असे कधीच करणार नाही. त्यावेळी मांजरीसाठी चिंतेत होत्या म्हणून हा निर्णय घेतला.

 

Leave a Comment