अक्षय कुमार ठरला एका वर्षात 700 कोटी कमावणारा पहिला अभिनेता


एका वर्षात 700 रुपये कोटी कमावणारा अक्षय कुमार पहिला अभिनेता ठरला आहे. त्याचे 2019 मध्ये 4 चित्रपट (‘केसरी’, ‘मिशन मंगल’, ‘हाउसफुल 4’ आणि ‘गुड न्यूज’) रिलीज झाले. चारही चित्रपटांनी मिळून 700 रुपये कोटींची कमाई केली.

अक्षयच्या चारही चित्रपटांची कमाई

दुसरीकडे दक्षिणेचा अभिनेता प्रभास या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. हिंदी बॉक्स ऑफिसवर ज्याने एकाच चित्रपटाच्या बळावर एका वर्षात 500 कोटी रुपयापेक्षा जास्त कमाई केली. एस. एस. राजामौली दिग्दर्शित त्याच्या ‘बाहुबली 2 : द कन्क्लूजन’ (2017) च्या हिंदी व्हर्जनने 510.99 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता.

एका वर्षात सर्वात जास्त कमाई करणारे 5 अभिनेते

कमी बजेटच्या चित्रपटांनीदेखील गेल्या वर्षात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यामुळे चित्रपटांचा एकूण खर्च कमी ठेवला पाहिजे, असे आता बॉलीवूडकरांना समजू लागले आहे. मग तो कोणत्याही धाटणीचा असो. नुकताच रिलीज झालेला अक्षय कुमारचा ‘गुड न्यूज’ हे ताजे उदाहरण आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या कमी बजेटच्या चित्रपटाने १६७.५० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. यापूर्वीदेखील त्याच्या कमी बजेटच्या चित्रपटाने एवढीच कमाई केली होती. यात त्याचा ‘मिशन मंगल’ आणि ‘केसरी’चादेखील समावेश आहे.

अक्षय कुमारचे कमी बजेटवाले चित्रपट

Leave a Comment