अमेझोनचे जेफ बेजोस भारत भेटीवर


ईकॉमर्स जायंट अमेझोनचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस पुढील आठवड्यात भारत भेटीवर येत असून त्यात ते पंतप्रधान मोदी यांची भेट घेतील असा अंदाज वर्तविला जात आहे. अर्थात या संदर्भात अमेझोन कडून कुठलाही अधिकृत खुलासा केला गेलेला नाही.

लघु, मध्यम उद्योग केंद्रित कार्यक्रम (संभव) १५ आणि १६ जानेवारी रोज होत असून त्यात सामील होण्यासाठी बेजोस भारतात येत आहेत. त्यावेळी ते केंद्रीय सरकारी अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी चर्चा करतील. बेजोस यांनी मोदी यांची भेट घेण्या अगोदरच येथील अखिल भारतीय व्यापार संघटनेनी मोदी याना बेजोस यांची भेट घेण्यापूर्वी संघटनेशी चर्चा करावी असे अपील केले आहे. ई कॉमर्स क्षेत्रात अमेझोन आणि फ्लिपकार्ट यांच्यामुळे भारतातील लघु उद्योग आणि व्यापाराचे मोठे नुकसान झाले असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

या संघटेनच्या प्रवक्त्यांच्या मते बेजोस यांनी एफडीआय पॉलिसी उल्लंघन केले असून अमेझोनची गैरवर्तणूक लपविण्यासाठी बेजोस मोदी यांची भेट घेण्यास उत्सुक असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षात ६२४३१ कोटींचे नुकसान होऊनही बेजोस आजही जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची मालमत्ता ८.२७ लाख कोटींची आहे.

Leave a Comment