2021 पर्यंत या ठिकाणी तयार होणार जगातील सर्वात उंच रेल्वे पूल

काश्मिर खोऱ्याला भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडण्याचे स्वप्न डिसेंबर 2021 अखेरपर्यंत पुर्ण होणार आहे. कटडा-बनिहालमधील रियासी येथील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे काम सुरू असून, हा पूल अर्धा बनून तयार झाला आहे. पुढील वर्षी पुल पुर्ण तयार झाल्यावर रेल्वे थेट काश्मिरमध्ये जाऊ शकणार आहे. वर्ष 2002 मध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंकला राष्ट्रीय योजना घोषित करण्यात आले होते.

111 किमी लांब कटडा-बनिहाल रेल्वे लिंकमध्ये 53.66 किमी लांब कटडा ते धरम खंडमधील अंतरावर सर्वात अवघड काम सुरू आहे. हा मार्ग रियासी, मूरी आणि पीर पंजाल पर्वतांच्या सर्वात अवघड भौगोलिक जागेतून जातो.

याचा 46.1 किमी म्हणजेच एकूण लांबीच्या 86 टक्के रस्ता हा बोगद्यातून जातो. तर 4.6 किमीचा मार्ग पुल आणि 5.5 टक्के मार्ग कटिंग आणि तटबंधावरून आहे. कोकण रेल्वेकडे हा प्रोजेक्ट आहे.

या प्रोजेक्टमध्ये जगातील सर्वात उंच पुलाचे (359 मीटर) काम सलाल हायड्रो पॉवर डॅमच्या जवळ चिनाब नदीवर सुरू आहे. पुलाची लांबी 1315 मीटर आहे. म्हणजेच आयफेल टॉवरच्या तुलनेत 35 मीटर उंच आहे.

Leave a Comment