टीक-टॉक आपल्या फ्लॅटफॉर्मवरून हटवणार हिंसक व्हिडीओ

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकने भारतीय युजर्ससाठी महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. टिकटॉकने सांगितले की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून धार्मिक, राष्ट्रीयता इत्यादींच्या आधारावर एखाद्या व्यक्ती अथवा समूहाच्या प्रती हिंसेसंबंधित आक्षेपार्ह व्हिडीओ हटवणार आहे. या व्यतरिक्त कंपनीने सांगितले की, 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्सचे खाते देखील अ‍ॅपवरून हटवले जाणार आहेत.

काही दिवसांपुर्वीच अमेरिकन सैन्याने देखील टिकटॉक अ‍ॅप वापरावर बंदी घातली आहे.

दरम्यान सिक्युरिटी कंपनी चेकप्वाइंटने टिकटॉक अ‍ॅपमध्ये बग असल्याचा दावा केला आहे. याचा फायदा उचलून हॅकर्स तुमचे अकाउंट हॅक करू शकतात.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हॅकर्स तुमच्या अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओशी छेडछाड करू शकतात व व्हिडीओ देखील डिलीट करू शकतात. हॅकर्स युजर्सच्या मोबाईल नंबरवर टिकटॉकच्या नावावरून मेसेज पाठवून अकाउंट हॅक करू शकतात. त्यानंतर तुमच्या अकाउंटवर पुर्णपणे हॅकर्सचा ताबा असेल.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, टिकटॉकचे सबडोमेन https://ads.tiktok.com मध्ये देखील बग आहे. ज्याचा फायदा उचलून हॅकर्स व्हायरस असणारे लिंक साइटवर टाकू शकतात.

टिकटॉकने यातील काही बग्स फिक्स केले असून, काही बग्स फिक्स करण्याचे काम सुरू आहे. कंपनीने  अ‍ॅपचे नवीन व्हर्जन देखील जारी केले आहे, जे युजर्स डाउनलोड करू शकतात.

Leave a Comment