यामुळे 5 दिवस बंद राहणार सिद्धिविनायकाचे दर्शन


मुंबई : दररोज असंख्य भाविक त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात. यागणेशाच्या दर्शनाला नेते, अभिनेते, उद्योगपती, असे अनेक गणमान्य मंडळीही येत असतात.

माघी गणेशोत्सव येत्या 25 जानेवारी पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त सालाबाद प्रमाणे यंदाही सिद्धीविनायक मंदिरातील गणेश मूर्तीचे शेंदूर लेपण केले जाणार असल्यामुळे 15 ते 19 जानेवारीपर्यंत गणेशभक्तांना गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाही. सिद्धीविनायक मूर्तीची विधिवत पूजा दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता झाल्यानंतर गणेशभक्तांना गाभाऱ्यातून दर्शन सुरू होणार आहे. या काळात सिद्धिविनायकाच्या प्रतिमूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

अशा प्रकारचे शेंदूर लेपण दरवर्षी केले जाते. त्या काळात गाभाऱ्यात असलेल्या मुख्य मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात येते. त्या काळात गणेशाची प्रतिमूर्ती भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विधिवत विशेष पूजा केली जाते आणि त्यानंतर पुन्हा नेहमी प्रमाणे दर्शन सुरू होते.

Leave a Comment