येथे काम करायचे असेल तर तुम्हालाच कंपनीला द्यावे लागतील पैसे

सर्वसाधारणपणे काम करण्यासाठी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो. मात्र तुम्ही कधी ऐकले आहे का काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांनाच कंपनीला पगार द्यावा लागला आहे ? तुमचे उत्तर नक्कीच नाही असेल. मात्र सोशल मीडियाच्या माध्यामातून असे एक काम समोर आले ज्यात तुम्हाला काम करण्यासाठी कंपनीलाच तासाला 15 डॉलर द्यावे लागतील.

सोशल मीडियावर सध्या एका कामाचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये रिव्हर्स फायनान्स इंटर्नशिप करणाऱ्या इंटर्नला कंपनीलाच तासाचे 15 डॉलर (जवळपास 1000 रुपये) द्यावे लागतील.

एका ट्विटर युजरने इंडिड या नोकरी वेबसाईटवरील इंटर्नशीपचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, न्यूयॉर्क येथील कंपनी डेटा एनालिस्ट पदासाठी इंटर्न शोधत आहे.

यामध्ये लिहिले आहे की, तुम्हाला विविध एप्लाइड रिसर्च प्रोजेक्टचे अनेक डेटा एनालिसिस करावे लागतील. हे काम पुर्णवेळ असेल. पुढे लिहिले आहे की, ही रिव्हर्स फायनान्स इंटर्नशीप असून यासाठी तुम्हाला येथे काम करण्यासाठी तासाला 15 डॉलर द्यावे लागतील.

काही युजर्सनी ही इंटर्नशीपची जाहिरात इसेल अँड स्टेर्न कंपनीची असल्याचे देखील शोधून काढले आहे. यावर इंडिडने ट्विट केले की, ही पोस्ट वेबसाइटवरून हटवण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे.

https://twitter.com/_DamnGina_/status/1214718732578304000

हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत 85 हजारांपेक्षा अधिक युजर्सने लाईक केले आहे. तर 20 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी रिट्विट केले आहे.

Leave a Comment