राज ठाकरेंना १८ फेब्रुवारीला रांची न्यायालयात हजर राहण्याचे आदेश


रांची – बिहारच्या रांची येथील न्यायालयात राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून राज यांच्यावर छठपुजेप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राज ठाकरेंना येत्या १८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वी ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाने नोटीस जारी केली होती. पण नोटीशीला ठाकरे यांच्याकडून कुठलेच उत्तर मिळाले नाही. छठपुजेसंबंधीच्या राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे आपल्या मनावर आघात झाल्याचे याचिकाकर्त्यांने म्हटले आहे. ‘छठपुजा म्हणजे केवळ नाटक असते’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा राज ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

Leave a Comment