जीव वाचवण्यासाठी निर्भयाच्या नराधमाची अंतिम याचिका


नवी दिल्ली – आपल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. दिल्ली न्यायालयाने निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशी कायम ठेवण्याचा निकाल दिला होता.

या चारही आरोपींनी २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी देण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले होते. तसेच, न्यायालयाने या चारही आरोपींना अन्य पर्यायांचा विचार करायचा असल्यास १४ दिवसांचा अवधी दिला होता.

सर्वोच्च न्यायालयात निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. त्याने यामध्ये २२ जानेवारी रोजी देण्यात येणारी फाशी थांबवण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment