आयकर रिटर्न फॉर्ममध्ये मोठे बदल, आता द्यावी लागणार ही माहिती

करदात्यांना सोपे जावे यासाठी आयकर विभागाने 4 महिन्यांपुर्वीच आर्थिक वर्ष 2020-21 साठी रिटर्न फॉर्म भरण्याची सुचना दिली आहे. यात विभागाने मोठे बदल केले असून नवीन माहिती मागितली आहे. आयकर विभाग सर्वसाधारणपणे कोणत्याही आर्थिक वर्षासाठी आयटीआर फॉर्म एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जारी करतो. विभागाने सध्या आयटीआर फॉर्म-1 आणि आयटीआर फॉर्म-4 जारी केले आहेत. अन्य फॉर्म देखील लवकरच जारी करण्यात येतील.

घराचे संयुक्त मालक असेल तर भरा आयटीआर-2 –

आयकर विभागाने सांगितले की, वार्षिक 50 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणारे व्यक्तिगत करदाता अथवा हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) जर घराचे संयुक्त मालक असेल तर आता आयटीआर-1 फॉर्म भरू नये. अनेकदा कर वाचवण्यासाठी दांपत्य संयुक्तरित्या घर खरेदी करतात व त्यावर बँकेकडून मोठे कर्ज देखील मिळते. 2020-21 साठी त्यांना आयटीआर-2 फॉर्म भरावा लागेल.

पासपोर्ट नंबर –

आता करदात्यांना पासपोर्ट नंबर द्यावा लागणार आहे. हा नियम आयटीआर-1 आणि आयटीआर-4 शिवाय सर्व रिटर्न फॉर्मसाठी असेल.

परदेश प्रवासाची माहिती –

जर एखाद्या करदात्याने 2019-20 मध्ये परिवारासोबत परदेश प्रवास केला असेल, तर रिटर्नमध्ये त्याची अधिक माहिती द्यावी लागेल. या प्रवासात 2 लाखांपेक्षा अधिक खर्च केला असल्यास आयटीआर-1 फॉर्म भरता येणार नाही. जर हे करदाता आयटीआर-4 च्या कक्षेत येत असेल, तर त्यांना खर्च केलेल्या रक्कमेची माहिती द्यावी लागेल.

वीज वापराची माहिती –

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जर वीज बिल 1 लाखांपेक्षा अधिक असेल तर ते आयटीआर-1 दाखल करू शकत नाही. अशांना आयटीआर फॉर्म-4 चा वापर करावा लागेल व वीज बिलावर खर्च केलेल्या रक्कमेची माहिती द्यावी लागेल.

1 कोटींपेक्षा अधिक जमा रक्कमेसाठी –

जर करदात्याने 2019-20 मध्ये एक अथवा अधिक बँकेच्या चालू खात्यात 1 कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा केली असेल तर त्याला आयटीआर-4 फॉर्म भरावा लागेल. सोबतच आर्थिक वर्षात जमा केलेल्या रक्कमेची माहिती द्यावी लागेल.

Leave a Comment