पॉप स्टार जस्टिन बीबरला जडला हा गंभीर आजार

पॉप स्टार जस्टिन बीबर हा आपले खाजगी आयुष्य आणि लुक्ससाठी नेहमीच चर्चेत असतो. मात्र जस्टिन सध्या आपल्या आजारामुळे चर्चेत आला आहे. जस्टिन बीबरने आपल्या आजारबद्दल सोशल मीडियावर खुलासा केला आहे.

त्याने सोशल मीडियावर सांगितले की, तो लाइम डिझीज (Lyme disease) नावाच्या आजाराशी लढत आहे.  हा एक दुर्मिळ आजार आहे. त्याने लिहिले की, अनेक लोक म्हणत आहेत की जस्टिन खूप घाणेरडा दिसत आहे. ते हे पाहू शकले नाहीत की मी आजारी आहे. काही दिवसांपुर्वीच मला लाइम डिझीज आजार असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर क्रॉनिक मोनो असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे माझी त्वचा, मेंदू आणि उर्जा सर्वांवर परिणाम होत आहे.

https://www.instagram.com/p/B7EnV5VHEYp/?utm_source=ig_web_copy_link

जस्टिनने पुढे सांगितले की, हे सर्व मी लवकरच एका डॉक्युमेंट्री सीरिजमध्ये सांगेल. लवकरच ही सीरिज युट्यूबव अपलोड करेल. मी ज्या गोष्टीशी लढत आहे ते तुम्हा सर्वांना माहिती पाहिजे. मागील काही वर्ष माझ्यासाठी अवघड होती.

त्याने सांगितले की, योग्य उपचारानंतर मी आजारातून बरा होईल. यातून बाहेर आल्यावर मी लवकरच परत येईल.

Leave a Comment