वाहन अपघातांच्या घटनेत मोठी वाढ होत चालली आहे. ट्रॅफिक जॅम, वाहतूकीचे नियम न पाळणे अशा अनेक गोष्टी पाहिला मिळतात. काही लोक तर हटके जुगाड वापरून वाहने तयार करतात. याच वाहनांना पकण्यासाठी मेरठच्या वाहतूक पोलिसांनी खास अभियान चालवले. एका वाहनचालकला पकडल्यानंतर वाहन पाहून पोलिसांनी देखील कपाळाला हात लावला.

पकडण्यात आलेल्या या वाहनात स्कूटरचे इंजिन लावलेले होते. तर चाक बाईकची होती. यावेळी या वाहनाचा वेग ताशी 55 किमी होता. पोलिसांनी दिवसभरात अशी 28 जुगाड वाहन पकडले.

पकडण्यात आलेल्या वाहनाचा चालक आबिदने सांगितले की, याचे देखील इंजिन बाईकचे असून, चाके स्कूटरची आहेत. ही गाडी ताशी 70 ते 80 किमी वेगाने धावू शकते.

टीआय सुनील कुमार यांनी ही वाहने जप्त केली आहेत. बेकायदेशीर वाहनांना जप्त करण्याचे आदेश देण्यात आले असून, अशा वाहनांना नष्ट करण्यात येणार आहे. अनेक रिक्षाचालकांवर देखील यावेळी कारवाई करण्यात आली.