… म्हणून हा उद्योगपती फॉलोअर्सना मोफत वाटणार तब्बल 64 कोटी रुपये

जपानी फॅशन कंपनीचा मालक अब्जाधीश युसाकू मीझावा ट्विटरवर त्यांना फॉलो करणाऱ्या युजर्सला 90 लाख डॉलर (64 कोटी रुपये) वाटणार आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरवर दिली आहे. त्याने याला एक सामाजिक प्रयोग असल्याचे म्हटले आहे. याद्वारे पाहण्यात येईल की खरेच पैशांद्वारे लोकांच्या आनंदात वाढ होते का ?

मीझावा आपल्या फॉलोवर्समधील 100 लक्की युजर्सला ही रक्कम देणार आहे. फॉलो करणाऱ्या आणि त्यांची ट्विट रिट्विट करणाऱ्या लक्की युजर्सला निवडले जाईल.

अब्जाधीश उद्योगपतीला हे जाणून घ्यायचे आहे की, पैशांनी या व्यक्तींच्या जीवनावर काय व कसा परिणाम होईल. याची माहिती ते नियमित अंतराने सर्वेक्षण करून घेणार आहेत.

युट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये मिझावा यांनी हा एक गंभीर सामाजिक प्रयोग असल्याचे म्हटले आहे. यात विशेषज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ देखील रस दाखवतील.

युसाकू मिझावा तिच व्यक्ती आहे, जे एलॉन मस्क यांच्या स्पेस-एक्स विमानात बसून चंद्राची चक्कर मारणारे जगातील पहिले खाजगी प्रवासी असतील.

Leave a Comment