अन् त्या महिलेने लाच म्हणून दिली चक्क म्हैस!


सीधी: आपल्या देशात कोणतेही सरकारी काम करुन घेण्यासाठी लाच देणे हे काही नवीन नाही. पण आपल्यापैकी लाच देण्याला विरोध करतात. त्याचबरोबर काहीजण लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे भांडाफोड करण्याचे काम करतात. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशमधील सीधी जिल्ह्यातील एका महिलेने केला आहे. या महिलेने लाच म्हणून चक्क आपल्या म्हशीला तहसीलदार कार्यालयात नेले आणि या म्हशीलाच लाच म्हणून स्वीकारा असा आग्रहही तिने केला.

रामकली पटेल असे गांधीगिरीचा पर्याय अवलंब करणाऱ्या महिलेचे नाव आहे. आपल्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये रामकलीला नाव बदलायचे होते. संबंधित अधिकाऱ्याने त्यासाठी तिच्याकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्या अधिकाऱ्याला एवढी रक्कम तिने दिल्यानंतर त्या अधिकाऱ्याने तिच्याकडे आणखी रक्कमेची मागणी केली होती. त्यानंतर लाच देण्यासाठी रोख रकम नसल्याचे सांगत तिने म्हैशीचा लाच म्हणून स्वीकार करण्यास सांगितले. रामकली या पावित्र्याने तहसीलदार कार्यालयात खळबळ उडाली.

रामकली हीने लाच देण्यासाठी म्हैस आणली असल्याचे तहसीलदार मायकल टिर्की यांनी मान्य केले आहे. १४ नोव्हेंबर रोजीच रामकली पटेल यांचे काम झाले आहे. त्यांना त्या आदेशाची एक प्रतही मी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सब डिव्हीजन मॅजिस्ट्रेट आर. के. सिन्हा यांनी सांगितले की, हा प्रकार एका षडयंत्राचा भाग आहे. काही लोकांनी रामकलींना भडकवले असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment