मनसेने आपल्या विचार आणि कार्यपद्धती बदलल्यास युती शक्य


मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबत भाष्य केले आहे. मनसे आणि भाजपच्या विचारामध्ये अंतर आहे. जर आपली विचार आणि कार्यपद्धती मनसेने बदलली तर भविष्यात मनसेसोबतच्या युतीबाबत विचार करु, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दैनिक लोकमतच्या एका कार्यक्रमात राज ठाकरेंबाबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.

देवेंद्र फडणवीस यांना यावेळी मनसे आणि भाजप एकत्र येणार का असा प्रश्न विचारण्यात आला, त्याबाबत फडणवीस म्हणाले, मनसे आणि भाजप एकत्र येण्याची आज तरी कोणतीही चिन्हे नाहीत. मनसे आणि भाजपच्या विचारात अंतर आहे. आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने व्यापक विचार करतो. पण मनसेचे विचार वेगळे आहेत. मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात विचार करु, पण सध्यातरी ही शक्यता वाटत नाही.

Leave a Comment